पीर बाबाची कृपा भाग ५
दर्शनला त्या दिवशी पुर्णत रात्रभर बांधून ठेवल होत -
दर्शनच्या देहात घुसलेल्या त्या शक्तिने सुटण्यासाठी खुप प्रयत्न केले , शिवीगाळ, धमकी, सर्वकरून पाहिल..
पन दर्शनच्या घरातल्यांनी त्याला गच्च बांधून ठेवल होत..- सुटका होणे असंभव होत.
दुस-या दिवशी सकाळीच दर्शनला दरग्यात आणल गेल- ती एक चौकोनो दहा x दहा ची खोली होती- खोलीत चारही बाजुंना भिंतीवर हिरवा रंग होता ..
खाली पांढरी फरशी होती-
दर्शनला खोलीच्या मधोमध मांडीवर बसवल होत.
त्याच्यासमोर फकीर बाबा बसलेले त्यांच्या
अंगात हिरवा जब्बा होता- गालांवर मोठी वाढलेली पांढरट दाढी होती ,डोक्यावर पांढरी गोलसर टोपी होती . हातात एक सफेद मण्यांची माळ
आणी एक मोराच्या पिसांचा झाडू होता.
त्या पवित्र वास्तुत शुद्धतेचा अंश होता -
दैविक घटकांचा वावर होता..- आणी ह्या अश्या तामसी शक्तिंसाठी ही जागा म्हंणजे कैदखाना होत..
दरगा, अक्कलकोटच मंदिर, शेगावच मंदिर
ह्या अश्या पवित्र स्थळांत प्रवेश करताच , त्या बाध झालेल्या मानवाच्या आत लपून बसलेली शक्ति संतापून , क्रोधींत होऊन वर येते -
दर्शनच्या आत लपलेल्या म्हातारीचा आत्माही
तसाच वर झटकन वर आला होता.
वखवखलेल्या सुडभावनेच्या नजरेने
फकीरबाबांकडे पाहत होता - दात ओठ खात शिव्या देत होता.
" क्यु पकडा है इस नाजायस बच्चे को,
क्या दुश्मनी है तेरी इससे !"
" दुश्मनी बिश्मनी काय नाय थेरड्या , मला फक्त चिकन मटान रोजच खायला पायजे , म्हंणून पकडलाय ह्याला..! आणी आता असंच सोडणार नाही ह्याला!"
दर्शनच्या आत घुसलेल ते ध्यान घोग-या आवाजात उच्चारल.
" देख,मेरी बात सून , तेरी जिंदगी कबकी खत्म हो गई है, ईस बेचारे बच्चे को पकड़ के , तू ईसकी जिंदगी बरबाद कर रही है, इससे अच्छा - तू ईसे छोड से, और तो और मै तुझे मुक्ति दे दुंगा..!"
फकीर बाबा सौम्य स्वरात म्हंणाले.
" मला मुक्ती बिक्ती काय नको , मी नाय जाणार हे झाड सोडून !" दर्शनने जोरात बैलासारखी मान हलवली.
तोच फकीर बाबाने हातातला मोराच्या पंखांचा
झाडू वेगाने दर्शनच्या पाठणावर मारला.
" लाथो के भुत बातो से नही मानते , तुझे जा ना पडेगा , बोल!" फकीर बाबाने ह्या वेळेस दोनदा
मोराच्या पंखांचाझाडू दर्शनच्या पाठणावर मारला.
दर्शनच्या अंगात घुसलेली ती म्हातारी विळक्षण अश्या आक्रस्ताळी किंचाळली -
" नाही नाही जाणार मी!"
दर्शनच्या अंगात घुसलेले ती अमानवीय शक्ति आपल्या इराद्यावर ठाम होती - पन किती ऊशीर.?
" पकडो ईसे!" फकीर बाबा म्हंणाले.
दर्शनच्या वडिलांनी , आणी त्याच्या मोठ्या भावाने ,
दर्शनला पकडल.
फकीर बाबांनी एक चांदीचा कलशसारखा तांब्या हातात घेतला- उजवा हाताचा पंजा कलशात ठेवून तोंडाची आपसूकच हालचाल झाली - मंत्र पठन केले गेले.
फकीर बाबांनी तळहातावर मंतरलेल पाणी घेतल आणि तेच दर्शनच्या अंगावर शिंपडल..
दर्शनच्या अंगात घुसलेली ती शक्ति मुळाच्या देठापासून ओरडली..- किंचाळळी...
तो आवाज तिथे उपस्थीत सर्वाँच्या काळजाच चर्ररे करून गेला -
त्या साधरणश्या पाण्यात अस काय होत - की ती सैतानी शक्ति, ते पिशाच्छ जिवाच्या आकांताने ओरडल होत ? मंत्रांनी साधरणश्या पाण्याला लाव्ह्यासारखी शक्ति प्राप्त झाली होती, सामान्य नजरेला जरी ते पाणी सामान्य वाटत असल तरी त्यात काहीतरी विळक्षण,अकल्पनिय असे घटक निर्माण झाले होते - जे त्या अमानवीय शक्तिसाठी घातक होते.
फकीर बाबांनी दोनदा पाण्याचा शिडकाव केला ,
दर्शनची अवस्था जराशी बिकट झाली होती- जणू त्याच्या अंगातल्या ध्यानाची शक्ति कमी झाली असावी.
फकीर बाबांनी हातात एक पिवळा लिंबू घेतला - दुस-या हातात एक टाचणी घेतली- आणी त्या टाचनीच टोकदार टोक हलकेच दर्शनच्या तर्जनीवर टोचल..
तर्जनीतून लालसर रक्त बाहेर आल- त्याच रक्तात फकीर बाबांनी ती टाचनी माखवली- आणी पुन्हा लिंबाला टोचली- तोंडात पुन्हा मंत्र उच्चारले जाऊ लागले..
तसा दर्शनच पुर्णत शरीर शॉक लागल्यासारख झटके खाऊ लागल..- त्याचे डोळे पांढरे झाले , ..
दर्शनच्या देहात घुसलेली ती शक्ति कणाकणाने त्या लिंबूत कैद झाली होती..-
ते पिवळसर लिंबू काल्या रंगात परावर्तित झाल होत.
जणू तया शक्तिला आपल्यात सामावून घेताच लिंबूचा रंग कालसर करपट झाला होता.
आणि पुढच्याक्षणाला दर्शन धप्पकन जमिनीवर कोसळला..!
फकीर बाबांनी आपल्याच एका मांणसाला बोलावल..
तो काळ्या रंगाचा लिंबू देत त्या
मांणसाला बोल्ले.
" इसमें रूह कैद है, इसको आधीरात में कब्रस्तान में जाके गाड देना! और वापस आते वक्त पीछे मूडके बिल्कुल मत देखणा!" त्या माणसाने गपगूमान माण हलवली लिंबू घेऊन निघुन गेला.
फकीर बाबांनी दर्शनच्या वडीलांकडे पाहिल..
" आपके बच्चे को, एक भयानक रूहने पकडा था - आधी रात को अंधेरे में घुमने वाले एक ताकदवर शैतानी रूह थी वह- पर अब आप का बच्चा सेफ है, ईस बच्चे को है ताविज पहना दिजिये, ईस ताविज से उसे डर नही लगेगा.!" फकीर बाबा म्हंणाले.
दर्शनच्या वडिलांनी फकीर बाबांनी दिलेली तावीज घेतली आणि फकीर बाबांना मनोभावे हात जोडले .
तर मित्रांनो अश्या प्रकारे एका भयंकर शक्तिच्या फे-यात सापडून , त्या शक्तिने बधीत झालेला माझा मित्र सुखरूप रित्या बचावला होता.. !
एक महाभयंकए द्रुष्ट चक्राचा अंत झाला होता..
आणी आता ह्याक्षणाला ही सत्यकथा ईथेच संपत आहे..
तो मिलते है अगले सत्यकथेत..!
तो पर्य्ंत वाचत रहा, ऐकत रहा..!
समाप्त: