ही अनोखी गाठ - भाग 3 Pallavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ही अनोखी गाठ - भाग 3

भाग -3



थोड्या वेळात किशोर माधवीचा भाउ येतो...नंतर सर्व जण जेवण आटोपून हॉल मध्ये गप्पा मारत बसतात...
" ताई चल जातो मी येईन पुन्हा कधीतरी असं म्हणत किशोर दिशा ला घेऊन निघून जातो....."



पुढे........

पाच दिवस लगेच निघून गेले...... कुसुम शरदराव आणि आदिती तिघेही हर्षा ला घ्यायला पुण्याला आले.....दारावरची बेल वाजली....

" अहो दरवाजा उघडून बघा आले वाटतं...." माधवी किचनमधूनच म्हणाली

विजयराव दरवाजा उघडतात ....

दारावर शरदराव कुसुम आणि आदिती उभे असतात....

" या या शरदराव..... दोघेही एकमेकांना मिठी मारतात लहानपणाचे मित्र आता एकमेकांचे व्याही झालेले असतात म्हणून दोघेही मित्र खुश असतात....(दोघेही आता एकमेकांना आम्ही तुम्ही करुन बोलतात..)

"या बसा ...माधवी पाणी घेऊन ये गं ....." विजय राव

कुसुम आदिती आणि शरदराव आतमध्ये येतात.... कुसुम आदिती पहिल्यांदाच आल्या म्हणून दोघी सगळीकडे निरखून पाहत होत्या
2 Bhk फ्लॅट होता....एक हॉल ,एक किचन दोन बेडरुम......छोटसच घर पण खूप प्रसन्न वाटत होतं......


माधवी पाणी घेऊन आली तिने तिघांना पाणी दिले........ आदिती आणि समृद्धीचीही चांगलीच गट्टी जमली होती..... समृद्धी आदितीला घेऊन तिच्या रुममध्ये गेली.....माधवी जेवणाची तयारी करत असते‌..‌‌...हर्षा ही माधवीला मदत करते....सगळ्यांची जेवणं आटोपतात ... नंतर थोडावेळ सगळे गप्पा मारतात.... हर्षा सगळी भांडी धुवायला किचनमध्ये जाते...

"सोनू तु राहुदे मी भांडी घासते......जा तु तुझी जायची तयारी कर तुझं काही सामान वगैरे राहील का ते बघ चेक कर सगळं जा......" माधवी

" मम्मी सोड बरं ते सकाळपासून तुझी गडबड चाललीय जरा relax हो माझं आवरुन झालय तु जा बाहेर जाऊन बस मी इथलं सगळं आवरते बरं नंतर आख्खा तुलाच ताण येईल समू तर काही काम नाही करणार, तुला एकटीलाच आवरायला लागेल तसं आहे इथे मी तोपर्यंत करते जा तु.." हर्षा

माधवीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं....... कुसुम हे सगळं दृश्य कौतुकाने हॉल मधून पाहत असते.....ती लगेच किचनमध्ये जाते.....माधवी लगेच घाबरुन तिचे अश्रू पुसून " काही...ह.. हवं होतं का ताई......."माधवी

"नाही नाही मला काही नकोय तुमची मुलगीच आम्हाला सुन म्हणुन मिळाली तेच आमचं भाग्य......आणि तुम्ही काहीच काळजी करु नका जशी मला आदीती तशीच हर्षासुध्दा......हर्षाला मी माझ्या मुलीप्रमाणे जपेल तुम्ही त्याबाबतीत बेफिकीर राहा" कुसुम

आणखी काय हवं एका आईला........

विजयराव : शरदराव मला हर्षाच्या शिक्षणाचं बोलायचं होतं आता तिचं b.com second year आहे म्हटलं तर तुम्ही तिला पुढे शिकायची परवानगी द्यावी असे माझं म्हणणं होतं....

शरदराव: अरे विजयराव असं काय म्हणताय हर्षाला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू द्या.... तिला आम्ही कुठल्याच गोष्टीचं बंधन घालणार नाही...
हर्षा माझ्या मुलीसारखीच आहे.... त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बिंदास राहा...
विजयराव निश्चित होतात...

हर्षा जातानी दोघांना बिलगून रडू लागली.....

त्यांचा निरोप घेऊन ते मुंबईकडे जायला निघतात ....रात्री
१० वाजता घरी पोहोचतात ...

कुसुम : आदु जा हर्षाला तिच्या रूम मध्ये सोडून ये.......
हर्षा मान डोलावत आदीती सोबत रुमकडे निघाली....
हर्षा थोडी घाबरली होती छाती धडधडायला लागली होती....
आदितीने दरवाजा उघडला " ये वहीनी ही दादाची रूम आजपासून तुझी सुद्धा...... हर्षा इकडे तिकडे बघत नजर टाकत होती....बेड वर सगळिकडे गुलाबाच्या पाकळ्यांच होत्या..... तिला ते बघून घाबरल्या सारखं झालं....
ती खुपचं घाबरली......रुममध्ये कोणीच नसते...

" वहीनी ये....ही चेंजिग रुम आहे तुझे कपडे आणि सामान तु इथे ठेवू शकतेस ... आणि हे दादाचं सगळं सामान आहे त्याला सगळं एकदम परफेक्ट लागतं...... अस्ताव्यस्त पडलेले सामान त्याला अजिबात आवडत नाही... आदिती तिला नीट समजावून निघून गेली....
हर्षा चेंज करून फ्रेश होऊन आली...ती सगळी रुम न्याहाळत होती ....खुप मोठी रुम होती एकदम पॉश.... सुगंधित वास त्या रुममध्ये दरवळत होता.....सगळं एकदम परफेक्ट होतं कुठेच धुळीचा नामोनिशाण नव्हता सगळ्या वस्तू पध्दतशीर ठेवलेल्या होत्या........ नंतर ती गॅलरीमध्ये आली.....गॅलरी मध्ये छान वेगळ्या प्रकारचे प्लान्टस ठेवले होते..... गॅलरीमध्ये साइडला एक झोपाळा ही होता... हर्षा त्या झोक्यावर जाऊन बसली तिला तिच्या घरची आठवण येउ लागली....तिने लगेच आत जाऊन तिचा फोन आणला आणि माधवीला कॉल केला.....
"हॅलो " हर्षा

" हॅलो सोनू...बोल किती वाजता पोहोचली..."

"१० वाजता पोहोचलो आम्ही आणि आताच मी चेंज करून गॅलरीमध्ये बसलेय " हर्षा

"शिवम अजुन आले नाही का " माधवी

" मम्मी मला नाही माहित गं कधी येणार म्हणून तसं त्यांचं बरच काम असतं असं बाबा सांगत होते गाडितच.... त्यामुळे उशीर होईल..."
थोडंसं बोलून हर्षा फोन ठेवून देते.... आणि विचार करत बसते .... तिचे डोळे जड झाले होते तिला नकळत झोप लागली आणि ती तशीच झोक्यावर झोपी गेली....



"हॅलो ..शिवम बाळा तु घरी कधी येणार आहेस किती वेळ अजून " कुसुम

" Yes mom I will coming in 15 minutes " शिवम

शिवम फोन कट करतो


" जा जा घरी कोणीतरी वाट पाहत असेल....." आरव हसतच शिवमला चिडवुन बोलू लागला....

" Just shutt upp aarav " शिवम एक रागीट कटाक्ष आरव‌ वरती टाकून त्याच्या केबिनमधून निघून गेला "

( आरव हा शिवमचा जिवलग मित्र त्याचा bestfriend त्याचा personal secretary) आरवला त्याचा स्वभाव चांगलाच ठाउक होता.... म्हणून तो कुठलीच गोष्ट मनावर नाही घ्यायचा


रात्री १२ :१५ वाजता दरवाजा उघडून शिवम रुममध्ये आला.....त्यानी एक नजर बेडवर टाकली आणि एक सुस्कारा सोडत तो बाथरुममध्ये निघून गेला.... काही वेळात तो बाहेर आला त्याला गॅलरीची स्लाईड उघडी दिसली तसं तो बंद करायला गेला.... तेवढ्यात त्याला हर्षा झोपाळ्यावर अंग चोरुन झोपलेली दिसली.....तो तसंच तिच्या जवळ गेला....ति एकदम शांत झोपली होती...... एकदम निरागस दिसत होती....चेहर्यावर हलकासा लाईटचा प्रकाश पडला होता..... समोरचे छोटे खोडकर केसं हवेमुळे बाहेर निघाले होते आणि तिला त्रास देत होते.... मेकअपचा तर नामोनिशाण नव्हता तरी खूप सुंदर दिसत होती....शिवम काही वेळ तिला पाहूनच हरवून गेला नंतर तिची हालचाल होताच तो भानावर आला पण ती अजूनही झोपलेलीच होती त्याला समजत नव्हते काय करावे....... तसं त्याने तिला हलक्या हाताने उचलून तिला आतमध्ये नेलं आणि बेडवर झोपवलं..... बेडवरच्या गुलाबाच्या पाकळ्या त्यानी डस्टबिन मध्ये टाकल्या.....त्याने तिच्या अंगावर एक blanket टाकलं ..... आणि बेडवर ची एक पिलो घेऊन तो त्याच्या स्टडी रुम मध्ये निघून गेला.....

सकाळी हर्षाला पक्ष्यांच्या किलबिलाटमुळे जाग आली ती डोळे चोळत उठली आणि इकडे तिकडे पाहिले तिला वाटलं रात्री शिवम घरी आलेच नाहीत.....ती लगेच उठून गॅलरीमध्ये गेली तिचं लक्ष झोक्यावर गेलं तिचा फोन झोक्यावरच पडून होता तिला आठवलं मी तर रात्री इथेच झोपले होते ती आठवतच मनात विचार करु लागली...तिचा फोन घेऊन ती आतमध्ये आली तिला बेडवर ही गुलाबाच्या पाकळ्या दिसल्या नाहीत म्हणजे रात्री शिवम रुममध्ये आलते आणि आपल्याला ही बेडवर त्यांनी आणुन ठेवले ति तसंच लाजत आणि घाबरत विचार करुन बाथरूम मध्ये निघून गेली........
काही वेळातच हर्षा बाथरूम मधून बाहेर आली शिवम बेडवर बसून लॅपटॉप वर काही तरी काम करत होता आणि एका हातानी फोन‌ कानाला लावून कोणाला तर रागातच ओरडत होता तो खुप रागात दिसत होता......ती घाबरतच मिरर जवळ गेली आणि हेअर ड्रायर नी केस सुकवू लागली..... हेअर ड्रायर च्या आवाजाने शिवमची नजर तिच्यावर स्थिरावली.... स्काय ब्लू कलरची नेटची साडी त्यात साडी कमरेच्या खाली नेसली होती आणि त्यातुन तिची गोरीपान काया अन् ओले केस असल्यामुळे तिच्या मानेवर आणि खांद्यावर पाण्याचे थेंब पडले होते.....एकदम सेक्सी दिसत होती.....शिवम तर क्षणभर तिच्या सौंदर्यात पूर्ण बुडून गेला होता....... हर्षाला मिरर मधून शिवम तिला पाहत असल्याचे दिसलं...... तिला खुपच ऑकवर्ड फिल झालं ती लगेच घाबरुन रुममधून बाहेर निघून गेली........ती खाली हॉलमध्ये आली... शरदराव आणि अमर काहितरी डिस्कस करत होते....तीने लगेच जाऊन पदर डोक्यावर घेत दोघांच्या पाया पडली...

" नेहमी खुश राहा " शरदराव हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.....अमरच्याही पाया पडून ती किचनमध्ये गेली


" ताईसाहेब तुम्हाला काही हवंय का मला सांगा मी करुन देते " राधा काकू म्हणाल्या.....

नाही ते...ती बोलणारच की कुसुम तिथे आली आणि तिला म्हणाली

"हर्षू आधी पुजा करुन घे आणि मग नंतर तुला जे गोड बनवता येईल ते बनव..."

हर्षु हा म्हणत देवघरात गेली.... देवघरातील सगळे देव धुवून तिने कोरडे केले.... ओठांवर देवाचं नाव घेऊन ती सगळं व्यवस्थित रित्या करत होती......धुप अगरबत्ती लावून तिने छान रांगोळी ही काढली नंतर बाहेर अंगणात जाऊन तुळशीची पुजा करुन आली आणि आरती म्हणून सगळ्यांना आरती दिली......तिला तर खुपचं प्रसन्न वाटत होते..... कुसुम तिला कौतुकाने पाहत होती......नंतर हर्षा कुसूम जवळ जाऊन तिच्या पाया पडली.......
"सौभाग्यवती भव.."
तिच्या डोक्यावरून हात फिरवत कुसुमने तिला किचनमध्ये नेलं ...... आणि राधा काकूंना तिला सामान‌ काढून द्यायला सांगितले आणि कुसुम निघून गेली....तेवढ्यात अनिता किचनमध्ये आली

" तुला गोड बनवता येतं ना म्हणजे उगाच नावानी करायचं म्हणून करशील आणि उगाचंच नुकसान करुन होईल " अनिता कटू हसतच हर्षाला म्हणाली ...... आणि फ्रिजमधुन ज्युसचा जार घेऊन निघून गेली

(तसं अनिताला हर्षा अजिबात आवडली नव्हती कारण ती मिडल क्लास घरातून होती म्हणून.....तिला पैशांच खूप गर्व होते )


हर्षाला जरा वाईटच वाटलं पण तिने जास्त मनावर न घेता दुर्लक्ष केले..

राधा काकूंनी तिला शेवयाची खीर बनवायचं सामान आणून दिले....

हर्षाने लगेच साजुक तुप पॅनमध्ये गरम केले त्यात कापलेले काजू बदाम भाजून घेतले नंतर त्याच तुपात नीट मनुके फ्राय केले ..... नंतर पॅनमध्ये शेवया मंद आचेवर चांगल्या भाजून घेतल्या..... नंतर पॅनमध्ये दुध उकळून
घेतले आणि त्यात शेवया घातल्या....त्याला चांगलं शिजवून घेतलं ... नंतर दुध घट्ट झाल्यावर त्यात तिने प्रमाणात साखर टाकली व त्याला मिक्स केले नंतर त्यात भाजलेले काजू बदाम मनूके पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर घातली आणि थोडावेळ शिजवलं......

राधा काकू कौतुकाने हर्षा कडे बघत होत्या.....

हर्षाने एका वाटीत ती खीर काढून त्यावर तुळशीचं पान ठेवलं आणि देवघरात प्रसाद ठेवून देवाच्या पाया पडली....

नंतर राधा काकू आणि हर्षा खीर बाहेर घेऊन आल्या...

सगळेजण डायनिंग टेबल वर बसले होते.....हर्षा एक वाटी घेऊन आजीकडे गेली आणि त्यांना वाटी दिली त्यांच्या पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सगळयांना खीर देउ लागली....

" खुपच छान बनवली आहे माझ्या नातसूनेने खीर " सुशीला बाई खीर खात म्हणाल्या



" हो खरंच खुपच छान झाली आहे हा खीर......मला अजून एक वाटी हवी " शरदराव

अनितानेही खीर खाल्ली पण ती काहीच बोल्ली नाही.... आवडली तर होती पण तसं दाखवायचं नव्हतं

"वॉव वहीनी तु तर खुप छान खीर बनवली " नील
तसं हर्षानी सर्वांना हसून प्रतिसाद दिला.....

कुसुम आदिती अमर सर्वांनी तिचं कौतुक केले

तेवढ्यात शिवम खाली आला

" मॉम ......

तसं कुसुम ने हर्षाला इशारा केला.....तसं हर्षा घाबरतच शिवमला नाश्ता देऊ लागली..... हर्षानी एक खीरची वाटी त्याच्या पुढे ठेवली आणि साइडला जाऊन थांबली.......

शिवम ने खीरीवर एक नजर टाकली आणि एक चमचा घेऊन
खीर खाऊ लागला..... हर्षाचं सगळं लक्ष त्याच्यावर होतं...त्याची प्रतिक्रिया काय असेल तिला त्याची उत्सुकता लागली होती......

पण त्याने काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे हर्षाचा चेहरा उतरला...पण तिने तसं दाखवलं नाही

" शिवम हर्षाचं ॲडमिशनचं बघ "शरदराव

"ओके " शिवम


चल मॉम मी जातो.... कुसुमला मिठी मारत शिवम निघून जातो....


***************************************
क्रमशः

©® ~ पल्लवी


स्टोरी कशी वाटतेय ते नक्की सांगा.......😊