संगीत शारदा - अंक - 2

  • 11.6k
  • 2
  • 3.3k

संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल अंक दुसरा रवेश पहिला ( स्थळ : गंगापुरांतील एक रस्ता ) दीक्षित : ( स्वगत ) या क्षेत्रीं येऊन जवळ जवळ महिना होत आला. इतक्या अवधींत आम्हीं काय केलें ? कां, पुष्कळ केलं. पहिली गोष्ट ही कीं, व्यवस्थित वळण बांधून येथील सरकारी हेरंबमहालांत आमच्या श्रीमंतांची स्थापना केली. कांहीं माहिती मिळवून, त्या माहितीला थोडं धोरण जुळवून आणि आंत आमची स्वतःची कल्पना मिसळून श्रीमंतांना शोभण्यासारखं व लोकांना पटण्यासारखं एक नांव शोधून काढलं. तें कोणतं ? तर मंडलेधरकरांचे सापत्न बंधु जयघुंडिराज. या क्षेत्रीं आल्या दिवसापासून विद्वान‍ , शास्त्री, हरिदास, पुराणीक, अशांची योग्य संभावना; तसेंच दानधर्म, अन्नसंतर्पण, इत्यादिकांची गर्दी सुरू ठेवल्यानं श्रीमंतांच्या औदार्याचा