संगीत शारदा - अंक - 5

  • 10.8k
  • 3.3k

प्रवेश पहिला ( स्थळ : रस्ता ) कांचन० : ( वेडयाच्या वेषानें ) पद्य --- ( बारोप्रिया व्यागत ) घट तीन धनानें भरले ॥ नसती ठावे कोणा, गुप्त ते तळघरीं पुरले ॥ध्रु०॥ उरलें कन्याधन करिं पडतां ॥ व्याजवृद्धि वर्षासन येतां ॥ कांहीं थोडया काळे, पाहीन दैन्य मम सरलें ॥१॥ भुजंग बरा झाला कीं त्याच्या गळ्यांत पोरगी बांधतो आणि राहिलेला हुंडा घेतों चोपून. पण तो म्हणेल दीक्षितांकडून घे आणि दीक्षित आहेत कैदेंत. मग बरं यांतल्या रिकाम्या थैल्या किती आहेत पाहत नाहींत कुणीं ( सोडीत ) जयंताच्याऐवजीं मुलगीच झाली असती तर छान झालं असतं, अरे ! या थैलींत दगड कुणीं भरून ठेविले ! ( हंसून ) बायको म्हणते तुम्हांला वेड लागलं आहे बाहेर जाऊं नका. ( पाहून ) आली रे आली ! तीच आली. मला खांबाशीं बांधून डागायचा बेत आहे तिचा. हं ! पळातर इथून त्या देवळांत लपून बसूं.