श्यामची आई - 4

(14)
  • 8.1k
  • 1
  • 3.6k

श्यामची आई रात्र चवथी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली. जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ये बारकू ये माझ्याजवळ बैस. असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला: ते पावसाळयाचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वहात होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो.