श्यामची आई - 10

  • 8.8k
  • 1
  • 3.3k

मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला. ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सा-यांनी ऐकावे. मी सुध्दा आले असते पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली.