श्यामची आई - 20

  • 7.2k
  • 2
  • 1.6k

काय, सुरुवात करू ना, रे, गोविंदा श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते. गोविंदा म्हाणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले. श्याम म्हणाला. “तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल भिकाने विचारले. “शिवाय लोकांची श्रद्धा असते, तर ती का दुखवा त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. गोविंदा म्हणाला. “हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा. राम म्हणाला. “इकडेच बरे आहे. असा येथे बसतो. ते म्हातारबाबा म्हणाले. “श्याम, कर सुरुवात आता. राजा म्हणाला.