उन्हाळ्यात वापरा चंदन आणि घ्या त्वचेची काळजी..

  • 13.2k
  • 1
  • 3.1k

पाहता पाहता थंडी संपत आली आणि उन्हाळा वाढायला लागलाय. हवेत बदल व्हायला लागला कि त्वचेच्या तक्रारी हि सामान्य तक्रार दिसून येते. त्वचा हा अतिशय नाजूक अवयव आहे. त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी ब्युटी पार्लर ची आठवण यायला लागते. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्यच होतेच असे नाही.