श्यामची आई - 26

  • 7.2k
  • 2
  • 2.1k

मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार-रविवारीसुद्धा मनात आले, तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे. त्या वेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काही तरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वांत चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कोठून आणावयाचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे.