मला अश्या फुकट फुशारक्या मारणाऱ्या दोघांना, म्हणजे वरपिता आणि वधूपिता याना सांगायचं आहे कि हि हुंड्याची प्रथा कुठे तरी थांबवा. ह्यात कमीत-कमी एका गरीब कुटुंबाचा हकनाक बळी जातो. वरपिता हक्काने ने हुंडा मागतो आणि वधू पिता तो देण्यासाठी लागेल ती तजवीज करण्यासाठी झटतो. आणि मग कर्जाचा डोंगर आणखीनच वाढवत तो खोल खाईत घसरला जातो. ह्यामधूनच मग कर्जबाजारी शेतकरी आणि सामान्य माणसे सुटकेसाठी आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. आणि हि हुंड्याची प्रथा तशी सर्वच जातीत फोफावली आहे पण ती मराठ्यांमध्ये जरा जास्त जाणवते. तेव्हा कृपा करून ह्या हुंडा पद्धतीचा नायनाट मराठ्यांनी करून, सर्व मानव जाती समोर एक आदर्श ठेवावा आणि ह्यातच खरा मर्द पण आहे हे जाणून घ्यावे. दारू आणि नशाबाजी हा एक असा सामाजिक अजात शत्रू आहे कि तो जो समाज वर येऊ पाहत आहे त्यांना कायमचा अजगरासारखा जखडून खाली खेचत आहे. आता हि नशाबाजी पण सर्वत्र पसरली आहे. पण हिचे प्रमाण जास्त आहे ते अशा लोकात जे कायम स्वतःलाच कमी लेखत नेहमीच दुःखसागरात बुडलेले असतात. अशा स्वतःच मागास समजल्या जाणाऱ्याना सदानकदा असं वाटत असत कि उच्चवर्णीय आपला फक्त पाणउतारा करत आहेत आणि आपल्यावर फक्त अन्याय होत आहे आणि मग ह्या विरोधात त्यांनी काहीतरी ज्वलंत प्रतिकार केला पाहिजे, उठाव केला पाहिजेल.