लेख -सर्वप्रिय गायक म.रफी .ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------ -----------------------------३१ जुलै हा दिवस हिंदी फिल्म संगीत रसिका साठी भावव्याकुळ होण्याचा दिवस.३१ जुलै १९८० या दिवशी गायक म.रफी आपल्या अव्वाजातील हजारो गाणी मागे ठेवून या फानी -दुनियेला सोडून आपल्यातून निघून गेला , आज ३८ वर्षे झालीत रफीच्या जाण्याला ,पान आज ही रफीची असंख्य गाणी रसिकांच्या मनात जशीच्या तशी आहेत.१९४६ च्या अनमोल घडी -संगीत नौशाद - या चित्रपटातील तेरा खिलोना टूटा बालक.. या गाण्याने रफीच्या आवाजाला ओळख मिळण्यास सुरुवात झाली, एक गायक म्हणून त्याची प्रकाशझोतात येण्याची ही सुरुवात होती ..रफीची हे स्वर - पुढे ३४ वर्षे हिंदी चित्रपट संगीतास समृध्द करीत गेले .