११. वळण..- “आमची गुरुदक्षिणा एकच ती म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलीला अथवा बाईला तु तुझ्यासारखेच आचार आणि विचाराने समृद्ध करायचे हो ना ग मावशी ..” नितीका म्हणाली . “अगदी बरोबर बोललीस तु ..काय ग भार्गवी देशील न. ताई म्हणाल्या “हो ताई ..हेच माझे तुम्हा दोघींना “वचन राहील. एवढे बोलून भार्गवी बाहेर पडली.. आता एका नवीन वळणा वरून तिचा प्रवास सुरु झाला होता. हे अनपेक्षित वळण तिला खुप सुखावणारे होते.