सत्यमेव जयते..

  • 12.3k
  • 1
  • 2.3k

भ्रष्टाचारावर बरेच चित्रपट आलेत आणि त्याच यादीत भ्रष्टाचार , सत्तेचा सातत्याने होणारा गैरवापर हाच विषय घेऊन सत्यमेव जयते ह्या चित्रपटाची भर पडली आहे. जॉन अब्राहम त्याच्या लुक्स साठी ओळखला जातो. बॉलिवूडचा अॅ क्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरकडे जॉनचे चाहते नजरा लावून बसले होत़. याचे कारण म्हणजे, जॉनचा यापूर्वी आलेला ‘परमाणु’ हा चित्रपट. ‘परमाणु’ला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. साहजिकचं यानंतर जॉनकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’ची प्रेक्षक वाट पाहत होते आणि अखेर १५ ऑगस्ट ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.