तू असतीस तर…

(41)
  • 8.1k
  • 10
  • 3k

“फक्त सात मिनिटं राहिलीत. स्टेशन येईल. काही मिनिटांनंतर तू माझ्या आयुष्यात कायमची नसशील. तू पूर्ण प्रवासात काहीच बोलली नाहीस. जाताना मनात काहीतरी ठेवून तू निघून गेलेली मला नाही आवडणार. प्लीज बोल ना!” केतन प्राजक्ताला तळमळून सांगत होता. ट्रेन वेगानं धावत होती आणि वेळही. खिडकीतून स्टेशन दिसत होतं. काही महिन्यांपूर्वी आयुष्यात आलेल्या प्राजक्ताचा निरोप घेताना त्याला जड जातं होतं. अगदी काल परवापर्यंत जिला बघितल्याशिवाय दिवसाची सुरूवातही होत नव्हती, ती आता दूर निघून जाणार होती. डोळे अक्षरश: भरून आले होते. पण डोळ्यातून एक टिपूसही त्याला काढायचा नव्हता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेनचा वेग मंदावत होता. दोघंही गर्दीतून ट्रेनमधून खाली उतरले. सात