पहिल्यांदीच...

(30)
  • 2.8k
  • 5
  • 1.1k

टिंग टॉंग..टिंग टॉंग... घराची बेल बराच वेळ वाजत होती. पण दार उघडत नव्हत. आलोक निशाला भेटण्यासाठी आतुर झाला होता पण दार मात्र उघडत नव्हत. आलोकने पटकन मोबाईल काढला आणि निशाला फोन लावला पण निशा फोनला सुद्धा उत्तर देत नव्हती. आता मात्र आलोक घाबरला. त्याला काय कराव सुचत नव्हत पण काही अघटीत घडल नसेल अश्या विचारांनी तो मटकन खालीच बसला. तितकात त्याला कोणीतरी दाराशी आलंय अशी जाणीव झाली. तो लगबगीने उठून उभा राहिला.