सोनसाखळी - 5

  • 12.2k
  • 4k

एक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले. गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, आज इतक्या लवकर काय काम आहे? प्रधान म्हणाला, महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे. राजा म्हणाला, विचारा. संकोच करु नका. प्रधान म्हणाला, महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात. राजा म्हणाला, का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात? प्रधान म्हणाला, महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे.