बाप्पांची जंगल सफर

  • 12.4k
  • 1
  • 3.7k

बाप्पांची जंगल सफर              “ये आई... मी ना आता बाहेरच जाणार नाही..” इटूकले मिटूकले उंदराचे पिल्लू आपल्या आईला म्हणाले.“अरे बापरे... पण तू का नाही जाणार बाहेर..?” आईने पिल्लाला विचारले.“कारण मला कुणीच पसंद करत नाही.सगळे तर त्या चीनमीन चिऊला , विंकी खारुटली आणि मोहन मोरालाच पसंद करतात.मला तर कुणी विचारत देखील नाही.मी बाहेर गेलो तर कुणी मला पाहात नाही.बोलत नाही.मला आता इथे मुळीच राहायचे नाही..”“अरे पण तू निघून गेलास तर मग मला तुझी आठवण येईल.आणि मग रात्र झाल्यावर तू कुठे झोपणार..? आणि काय खाणार..?”“ह्याचा तर मी विचारच केला नव्हता..मग आता मी काय करू..?”