प्रेरक- विचार - भाग - ४ था

  • 7.6k
  • 2.4k

प्रेरक-विचार - भाग-४ था ---------------------------------- लेख- मनापासून ------------------------------------------------- मन करुणेचा डोह , मन मायेचा सागर मन सरिता प्रवाही , मनात भरती प्रेमाची ... अशी अवस्था मोठी आनंद देणारी आहे. मनापासून या शब्दातूंच आपल्याला उत्स्फूर्त-भावनेचा स्पर्श होत असतो .आता हेच बघा की , मी काय, तुम्ही काय ,अगदी कुणी असो, आपण जे कार्य आपल्या हातात घेतो ते पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण अगदी मनापासून करीत असतो , -तन-मन-धन अर्पण करून स्वतःला कार्यात झोकून देतो .अशी अवस्था कधी असते ? याचे उत्तर आहे जेंव्हा आपण काम मनापासून करीत असतो. आपले काम पाहून बघणारे म्हणतात ..क्या बात है..इसको बोलते काम.