आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर..

(30)
  • 12.1k
  • 2
  • 2.7k

आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर.. पुन्हा एकदा 'सबकुछ सुबोध' असलेला "आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर.." आज गुरुवार ८ ऑक्टोबरला आपल्या भेटीस आला. अभिनेता सुबोध भावेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा चित्रपट आहे. एका मागे एक असे अव्वल चित्रपट, मालिका करत सुबोध भावे आपलं मनोरंजन करत आहे. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. ‘नाथ हा माझा’ या कांचन घाणेकर लिखित कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली असून सुबोध भावे मनाला भावतो. पण बाकीच्या कलाकारांच्या भूमिकेला तितका वाव मिळाला नाही म्हणूनच हा