प्रेरक- विचार . भाग - ५ वा

  • 7.9k
  • 2
  • 2.5k

मित्र हो - नमस्कार , प्रेरक -विचार भाग -५ वा आपल्या अभिप्रायासाठी देतांना खूप आनंद होतो आहे. हे लेखन वाचून कसे वाटले ?, आपले अभिप्राय जरूर कळवणे. १. लेख - शाळेत जाणऱ्या मुलांचा डबा . --------------------------------------------------- रोजच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या ताब्यात राहून आपण सारेजण अतिशय कंटाळून गेलेलो असतो ,घर ते कार्यालय आणि परत कार्यालय ते घर या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून कधी काळी आरामात आणि रमत-गमत जाता येत होते असे म्हणायची वेळ फक्त मोठ्या शहरातील लोकांच्यावर आहे असे मुळीच नाही , लहान मोठ्या शहरातील, गावातील स्थिती फारशी वेगळी नाही तिथल्या मानाने आता तिथेही गर्दी आणि गोंधळ आहेच आहे .