पॉर्न हवं की नको ?

(55)
  • 12.4k
  • 5
  • 3.4k

हो ती क्रिया नैसर्गिक आहे पण आपण पॉर्न बघून त्या क्रियेला बेधडक आणि अमानवी क्रियेत रूपांतरित करीत आहोत . पॉर्न मध्ये स्त्री जातीला काहीही रिस्पेक्ट नसते एका अर्थाने उथळ भावनेचा विद्रुपी खळखळाट असतो . खरचं नैसर्गिकरित्या अशा प्रकारे सेक्स घडून येऊ शकतो का ? की स्त्रीचा एक टाकाऊ फक्त शरीर सबंधासाठी म्हणून नुसता तेवढ्या पुरता वापरच केल्या जातो . उपभोग्य वस्तू समजून ?? त्यात भावना नसतातच असतो तो अमानवीपणा जो तुमच्या वैक्तिक जगा पेक्षा कितीतरी पटीने भिन्न आहे त्या जगात तुम्ही डोकावून पहायचा प्रयत्न करता . 90 ज्या मुलांकडे मोबाईल अँड्रॉइड आहेत ते ह्या गोष्टीकडे वळतातच . हे असं वय असत ज्या वयात मुलांना आपल्या मानसिक आणि शारीरिक वाढीकडे लक्ष द्यायला हवं , पण या पॉर्न मुळे मुलं आपला अमूल्य वेळ गमावतात .