ईट्स टाईम टु डिस्को

  • 6.7k
  • 4
  • 1.6k

चालक तावातावाने कॅब मधून बाहेर आला आणि madam च्या सीट चे उघडे असलेले दार त्याने बंद केले आणि आणि परत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि काहीतरी पुटपुटत निघाला. ती ऑफिसच्या बाहेर उभारलेली होती.ऑफिस चार मजली होते.तिने तिच्या हातात असलेल्या घड्याळात वेळ बघितली.सकाळचे ८.४५ वाजलेले होते.तेवढ्यात तिने तिच्या पर्स मधून बारीकसा आरसा बाहेर काढला आणि त्यात तिने स्वतःचा चेहरा एक मिनिट न्याहाळून पाहिला.चेहरा टापटीप असल्याचे खात्री झाल्यावर तिने आपला आय-फोन सेवन एस पर्स मधून बाहेर काढला.आय-फोन बाहेर काढून तिने तिच्या ओठांचा चंबू केला आणि उभ्या उभ्या एक मिनिटात ५० सेल्फी काढले. त्यातले काही सेल्फी तिने उभ्या उभ्या तिच्या Instagram ला अपलोड करत