नाळ..

(51)
  • 9.3k
  • 10
  • 3k

नाळ.. नाळ ह्या चित्रपटाच्या नावावरूनच त्यात काहीतरी वेगळ पाहायला मिळणार अस जाणवतच! दर्जेदार चित्रपट आणि झी स्टुडीओज् हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. नाळ ह्याच धाटणीचा चित्रपट आहे का हे पाहण औत्युक्याच ठरणार आहे. मराठी चित्रपटात बरेच वेगवेगळे प्रयोग होतांना दिसत आहेत आणि मराठी प्रेक्षकही चांगल्या चित्रपटांना नेहमीच उचलून धरतो. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ ह्या चित्रपटाची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहे. नागराज