समाजमान्य बलात्कार

(248)
  • 30.1k
  • 63
  • 8.6k

कविता एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली साधारण मुलगी. राहणीमान आणि आचार विचार हे सुद्धा साधारणच. दहावी पर्यंत च शिक्षण गावातच झालं. त्यामुळे 11 वाजता शाळेत आणि 5 वाजता घरी. मैत्रिणी बरोबर खेळायला जायचं असेल तरी घरी विचारून जायचं आणि सातच्या आत घरात असा दंडक. घरी संपत्ती अमाप नसली तरी सगळी भौतिक सुखे होती. पण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये संपत्ती पेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची मानली जाते आणि तसंच काहीस वातावरण कविता च्या घरी होत. अश्याच चौकटीबंध वातावरणात कविता लहानाची मोठी झाली, खरं म्हणजे अगदी डोक्यावर ओढणी घेऊन चालायचं अस जरी नसलं तरी जीन्स घालायचा नाही, बाहेर गेलं तर जास्त हसायचं नाही. चार चौघात सांभाळून