मी सामोव्हारच्या दाराकडे तोंड करून बसलो होतो, आणि माझ्यासमोर दाराकडे पाठ करून पारस बसला होता. अगदी लक्षपूर्वक आम्लेटचा एक तुकडा गुंडाळून, त्यात काटा रोवून मी तो खाण्याकरता तोंडापाशी आणला, आणि समोर पाहिलं, तर माझं तोंड तसंच उघडं राहिलं. ऑम्लेट काट्यावरचं थिजलं. सामोव्हारचं दार मला एखाद्या चित्राच्या चौकटीमध्ये नवचित्रकलेसारखं चित्र नव्हतं, तर एखाद्या बिकिनी वॉलपेपरवर असते तशी गुलाबी हॉट पँट, त्यावर जाड काळा चामड्याचा पट्टा त्यावर ज्यात एक हिरा अडकवलाय अशी नाजुक बेंबी, आणि त्यावर निळसर रंगाची चिंधी बांधल्यासारखा डिझायनर टॉप, आणि त्यावर अगदी निरागस चेहरा अन् मोठे डोळे असलेली एक अगदी फे्रश दिसणारी तरुणी उभी होती. तिनं आमच्या टेबलावरच्या पारसला