लिहायलो बसलो खरा आज पण मनात इतके काही विषय आहेत की नेमकं कोणत्या विषयावर लिहू अन् सुरूवात कुठून करू सुचत नव्हतं. पीसीवर लावलेल्या माझ्या फेवरेट कलेक्शन मधलं एक गाण संपले आणि सुरू झाले.... "पीया बसंती रे, काहे सताये आजा..." "जाने क्या जादू किया.. " खरंच की एकदम ती आठवली, जादू झाल्यासारखी अचानक इतक्या वर्षांनी... अगदी जसे च्या तसे सर्व नजरेसमोर आले अन् थोड्या वेळासाठी भूतकाळात त्याच बसस्टॉपवर जाऊन बसलो जिथून मी काहीच न बोलता निघून गेलो होतो... जूलै २००६ मध्ये बीईएसटी मध्ये मी अॅप्रेंटीस म्हणून एक वर्षासाठी रूजू झालो. प्रत्येकी चार महीने वेगवेगळ्या तीन डेपोंमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता.