निर्वासित

  • 6.6k
  • 2.2k

जीन्स-टी शर्ट घातलेली सुप्रिया नेने-रमेश कांबळेची बायको लॅचचं दार लावून बाहेर पडली. टी-शर्टवर लेटेस्ट फॅशनची आफ्रिकन मण्यांची माळ. नो मंगळसूत्र! ओःऽऽ कमॉन! धीस वॉज कॅलिफोर्निया! दारावरची पाटी थरथरली. पाटीवर दोघांचीही नावंः वर सुप्रिया नेने- खाली रमेश कांबळे - नो मिस्टर - नो मिसेस - दोघे एकाच आय.टी. कंपनीत काम करताना एकत्र आले, आपल्या आई वडिलांनी बघितलेल्या टिपिकल मुलांना कंटाळलेली सुप्रिया रमेशच्या प्रेमात पडली अन दोघांनी झटक्यात लग्न सुद्धा करून टाकलं! पुढे हनीमून वगैरे झाल्यावर सावकाश सगळ्यांना कळवलं. रमेशनं पत्र उघडलं. एक पानीच होतं. सुरुवात थोडी वाचली आणि शेवट पाहिला - कळावे, आपला, बाविस्कर गुरुजी. त्याला आश्‍चर्य वाटलं. मग तो पहिल्यापासून पत्र वाचायला लागला आणि वाचता वाचता त्याचे डोळे विस्फारले.