प पाळीचा

(47)
  • 13.3k
  • 5
  • 3.4k

तुला नाही माहित तो डाग कसला आलाय? या अगोदर!!! मी माझे डोळे पुसत हुंदके देत नाही म्हटले तशी ती हसली आणि म्हटली की, तुझ्या आईने तुला नाही सांगितल का कधी? मी पुन्हा डोळे पुसत हुंदके देत नाही.... आणि शाळेच्या गेट वर आल्यावर मावशी म्हणाल्या, अगं लवकर जा घरी पुर्ण ड्रेस खराब होईल. तिथून जे धावले ते घरातच थांबले. हुंदके देत रागारागाने दुसरे कपडे घातले. आई जवळ आले. काय गं? का रडतेय? काय झाल? आणि पेपर इतक्या लवकर कसा सुटला?? तिच्या प्रश्नांची बरसात अन् माझे रडू थांबण्याचे नाव घेत नव्हते. कसबस आईने मला शांत केले. मी आपली रडत ती शुभांगी आहे ना तीला मी आता कधीच बोलणार नाही. का गं? काय केल तीने? माझ्या कपड्यावर लाल शाही फेकली आणि मॅडमनी मला घरी पाठवलं तीला काहीच बोलल्या नाहीत. कट्टी सगळ्यांची!!