‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’ मध्यंतरी अक्षय कुमार चा पॅडमन चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार होता. आम्हांला सुध्दा चित्रपटाची उत्सुकता लागली होती.म्हणून पॅडमन बघायला जायचं असा विचार केला होता. काही दिवसांनी ऑफिस मध्ये काम करत असतांना माझी मैत्रीण माझ्या विंग ला आली. आणि तिने माझ्या दुसऱ्या मैत्रीण जवळ चित्रपट बघायला जायचा विषय काढला.मी उत्सुकतेणे विचारलं "कोणता मूवी बघायचा?" त्यावर तिने आजू बाजूचा कानोसा घेत माझ्याकडे बघून फक्त ओठांची चालचाल करत पॅडमन अस सांगितलं. तिचं तस वागणं बघून लगेच " अगं ज्या गोष्टीचा एवढा बाऊ करतय त्याच विषयावर मूवी येतंय,त्याच नाव घ्यायला एवढं काय?"