उद्योग पद्म - धीरूभाई अंबानी

(17)
  • 11.7k
  • 6
  • 3k

धीरूभाई अंबानी संपूर्ण जगभरातील व्यावसायिक क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने प्रसिद्ध पावलेली भारतीय व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी. आशियातील सर्वोत्तम म्हणजे ५० व्यावसायिकात त्यांची गणना केली जाते. त्यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी धीरभाई यांचा भारत सरकारने मरणोत्तर ‘पद्म विभूषण’ हा सन्मान बहाल करून गौरव केला आहे. धीरूभाई यांच्या मनात लहानपणापासूनच आपल्या देशाविषयी आस्था आणि प्रेम होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य याबद्दल त्यांच्या मनात विशेष आदर होता. त्यांच्या कार्याबद्दल आपल्या मुलांनादेखील धीरूभाई आवर्जून गोष्टी सांगत असत असे त्यांचे पुत्र मुकेश अंबानी यांनी ‘ Dhirubhai Ambani Against All Odds’ या