2.0

(16)
  • 8.4k
  • 4
  • 2.8k

रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन हे ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. एस. शंकर दिग्दर्शित ‘ 2.0′ मध्ये तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ मध्ये घालण्यात आला असून चित्रपटाचं कथानक रोबोट चिट्टीच्या भोवती फिरताना दिसून येतं. यात रोबोट चिट्टीची भूमिका रजनीकांत यांनी वठविली आहे. रजनीकांत कायमच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. तर अक्षयकुमारही त्याच्या साहसदृश्यांसाठी लोकप्रिय आहे. या दोघांच्याही या वैशिष्ट्यांचा या चित्रपटात समावेश करण्यात आला असून त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकांना न्याय दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच त्यांना जोड मिळाली आहे ती त्यांच्या रंगभूषेची आणि संवादकौशल्यांची. या चित्रपटात उत्तम संवादशैलीचा वापर करण्यात आला असून रंगभूषेवरही तेवढाच जोर देण्यात आला आहे.