तु दिसायचीस जेव्हा जेव्हा.. माझे भाबडे मन प्रयत्न करायचे.. तुझ्याशी नजरेनं बोलायचा.. पण तुझी नजर नाही पडायची तेव्हा माझ्यावर.. मन मारून जेव्हा मी तिथून निघून जायचो.. तेव्हा चालताना शंभरवेळा तरी मागे वळून पाहायचो.. तू मला लपून पाहत तर नाहीस ना.. हेच बघायला.. आज या केवळ पंधरा मिनिटात मला माझं पूर्ण एक वर्ष धावल्यासारखं डोळ्यासमोर येत आहे. या संबंध वर्षातला प्रत्येक दिवस तुझ्या विचारांत हरवलेलो मी.. जमलंच नाही या संपूर्ण वर्षात.. तुझ्यावरून फोकस हटवणं.. म्हणून कुणाला जवळ केलंच नाही.. पण कदाचित आज मी स्वतःहुन स्टेजवर येण्याची हिम्मत केली म्हणून का होईना.. उद्या ओळख होईल खुप जणांशी.. तु येशील का बोलायला.. खात्री नाही मला.. आणि खरंतर तुझ्याशी डायरेक्ट येऊन बोलण्यापेक्षा.. मला इथे स्टेजवर बोलणं जास्त सोपं वाटतेय..