भुंडी कोवळा सूर्य कोवळी किरणे फेकत होता. सूर्यकिरणांमुळे हिरवा सडा आपसुकच पिवळसर पडत होता. 12वर्षाचा सुऱ्या, चुलीवरील भगुन्यातील पाणी अंघोळीसाठी उपसत होता. सुऱ्याची आजी तुळशीला पाणी घालतहोती. सुऱ्याची आई चुलीच्या घरात पोतरा लावत होती. सुऱ्याने बकेट उचलुन न्हानी च्या बाजुला असलेल्यादगडाजवळ ठेवली. तो अंघोळ करु लागला.तेवढ्यात त्याची आई रागाने ओरडली, 'त्या भगुन्यात पाणी कोणवतायचं?' सुऱ्याअंगावर पाणी ओततच बोलला, 'आयव.... र्हायलं वत्तो..!' एवढ बोलुन सुऱ्यातोंडाला , अंगालाफसाफसा साबण लावू लागला. आज्जी तुळशीला फेर्या घालु लागली. फेर्या घालत घालत आज्जी सुऱ्या बघुन हसुलागली आणि स्वतःशीच पुटपुटली 'नुस्त माकडावानी साबण लावतया..' तेवढ्यात आई चुलीच्या घरातुन बाहेरअंगणात आली. सुऱ्याला दगडावर बसुन अंघोळ करताना बघुन