स्वररत्न-- लता मंगेशकर

  • 13.8k
  • 4
  • 3.2k

लता मंगेशकर... भारतातच नाही तर संपूर्ण जगाला हे नाव उच्चारल्यावर लतादीदींनी गायलेलं कोणतं ना कोणतं मधुर गाणं ऐकू यायला लागतं. जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असलेलं हे नाव. मराठी, हिंदी आणि अन्य ३६ भारतीय भाषेत तसेच परदेशी जगतात पार्श्वगायन करून लतादीदी यांनी आपल्या चाहत्यांचा स्वतंत्र वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना “भारतरत्न" हा सर्वोच्च किताबही बहाल केला आहे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गानकोकिळेचा हा प्रवास.... आयुष्यातील कृतार्थता आणि लोकप्रियता अनुभविण्यापूर्वी लहान वयातच झालेल्या आघाताने लतादीदी यांचं आयुष्य बदलून गेलं. आपल्या वडिलांचा सांगीतिक वारसा समृद्ध करीत आणि सांभाळीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पाचही मुलांनी कुटुंबाचे नाव