प्रेक्षकांशी अखेरपर्यंत 'नाळ' जोडून ठेवणारा चित्रपट ? नाळ ? - प्रे

(9.9k)
  • 14.5k
  • 5
  • 3.9k

चित्रपटाची सुरूवात आपल्याला काही काळ बालविश्वात घेऊन जाते.चित्रपटात चैत्या या प्रमुख बाल कलाकाराची भूमिका श्रीनिवास पोकळे याने केली असून ग्रामीण भागातील मुलांचे जसे जीवन असते, तसेच तो जगत असतो. विटी दांडू खेळणे, नदीत पोहणे, गोट्या खेळणे, उनाडपणे फिरणे, आदि. चैत्याच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी केली असून ते सावकार असतात. चेत्याच्या आईची भूमिका देविका दफ्तरदार यांनी केलेली आहे. आठ वर्षाचा चैत्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. चैत्याचा मामा (ओम भुतकर) जेव्हा बहीणीला भेटायला येतो,तेव्हा चैत्याशी त्याचा होणारा संवाद यामुळे चैत्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते,चैत्या त्यावेळी संभ्रमात पडतो, काही वेळ गोंधळून जातो. व इथूनच चित्रपटाच्या मुख्य कथानकाला सुरूवात होते. काहीच दिवसापूर्वी जन्मलेले रेडकू जेव्हा मरण पावते.तेव्हा आपले रेडकू दिसत नाही म्हणल्यावर म्हैस हंबरडा फोडते.व दूध देत नाही.सावकार जेव्हा खोटे रेडकू बनवून म्हशी जवळ ठेवतो