पत्र

  • 8.9k
  • 2.9k

पत्र.. सकाळी सकाळी आई चुलीवर भाकरी करत होती . गरम भाकरीवर तूप आणि मीठ लावून खायला मला आवडत , म्हणून आई शेजारी बसून मी खात होते . तेवढ्यात एक आजी आमच्याकडे आल्या . ७०- ७५ वर्षाच्या आहेत . बऱ्याच थकलेल्या आहेत . काबाड कष्ट करून पाठीवर कुबड निघालं आहे . सुरुवातीपासूनच त्यांची परिस्थिती जेमतेम . दोन मुलं. घरी शेती नव्हती . दुसऱ्याच्या शेतात रोजान जाऊन घर भागवायचे . मुलांना शिकवण्याची दोघा नवरा बायकोला फार हौस होती . मुलांना शिकवण्यासाठी पैसे कमी पडू लागला म्हणून दोघांनी इतरांच्या शेतातील , रस्त्यावरील शेण गोळा करायचे , त्याच्या गौर्या लावून , त्यांचा