माऊली...

(23)
  • 8k
  • 6
  • 2.4k

माऊली... ‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया एकत्र येत ‘माऊली’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात रितेशची लोकप्रियता किती अफाट प्रमाणात आहे याचा प्रत्यय आला आहे. रितेश देशमुख सर्वच वयोगटाचा आवडता हिरो आहे. सध्या मराठी चित्रपट वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतांना दिसतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकतांना दिसत आहेत. देशभरामध्ये मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये रितेशची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. आणि याच कारणामुळे रितेशची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश टॉप १० मध्ये आला आहे. ‘माऊली’च्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश