बाबाराव देसाई फ्रीडम फायटर आणि सक्रिय समाजसेवक होते. यामुळे त्यांचे खूप लोकांशी संबंधही यायचे. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही. नवखा ऑफिसर मध्येच बोलून गेला तसा मिस्टर वाघने त्याला एक जळजळीत कटाक्ष टाकला. मिस्टर वाघचे म्हणणे धुडकावण्याची हिंमत कोणी करत नाही, जरी ते कोणाला पटले नाही तरी. आणि हे या नवीन ऑफिसरला माहीत नव्हते. मिस्टर वाघचे त्याच्याकडे असे पाहणे कमिशनरच्या लक्षात आले आणि त्याने दटावून त्या ऑफिसरला गप्प केले. नवीन खाडे, जरा शांत बसा. मिस्टर विजय वाघ कधीच चुकत नाहीत. पण सर मी फक्त त्यांच्या तर्कांतील कमजोर दुवा सांगितला. बाबाराव देसाई स्वातंत्र्य सेनानी व समाजसेवक जरी नसते, एक साधारण व्यक्ती असते, तरी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने भेटायला बोलावणे इतके काही अवघड नाही...