श्यामचीं पत्रें - 2

  • 10.7k
  • 2
  • 3.5k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. तूं सेवादलाची लहानशी का होईना शाखा सुरू केलीस, हें वाचून किती तरी आनंद झाला ! तुझ्या पत्राची मी वाटच पहात होतों. परंतु कांही तरी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केल्याशिवाय उगीच कशाला लिहा पत्र, असें जें तूं मनांत ठरविले होतंस त्यामुळें आतांपर्यत तुझें पत्र आलें नाहीं. खरें आहें. आपण खंडीभर चर्चा करतों. परंतु प्रत्यक्ष कार्य आरंभणे सर्दव दूरच राहतें. तूं तसा नाहींस ही चांगली गोष्ट आहे.