कृष्णभक्त

  • 6.1k
  • 2
  • 1.6k

कृष्णभक्त शितल पुण्यात जाँब करणारी लातुरची एक सामान्य मुलगी. सायंकाळचे ७ वाजले होते , ती अजुनही आँफीस मध्येच होती. रविवारी ट्रेक्रिंग ला जाण्याचा प्लँन बनवत होती. तेवढयात घरचा फोन आला. ' बेटा उद्या एक स्थळ येणार आहे. तु ९ च्या गाडीने निघ...' वडील बोलले. अचानक रिझर्वेशन मिळण अशक्य होतं. त्यामुळे महामंडळाच्या बसने ती निघाली. बसला प्रंचंड गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती . राञभर तिला उभं राहुन जावे लागले. बसमध्ये अनेक विचार तिच्या मनात पिंगा घालत होते. आजपर्यंत प्रत्येक स्थळाकडुन नकारच येत होता. कारण , ती खुप जाड आणि सावळी होती. वयही वाढल होतं. 28 वर्षाची झाली होती