डिलिव्हरी

(22)
  • 9.1k
  • 5
  • 2.4k

#डाक्टरकी -©डॉ क्षमा शेलार.डिलीवरी   विद्यार्थी दशेत असतांना पहिल्यांदा डिलीवरीचं पेशंट बघितलं तेव्हाचा मनावर कोरला गेलेला हा अनुभव!!    डिलीवरी...एखाद्या स्त्रीसाठी आई होणं ही किती अनमोल गोष्ट असते.बाईचा पुनर्जन्म होतो अगदी.आणि हा असा क्षण मला फार आतुरतेनं बघायचा होता.जो की,वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी असल्यानं फार लवकर बघायला मिळणार होता.मनात शिगोशीग उत्सुकता भरली होती.तो एवढूसा लोण्याचा गोळा कसा बरं जन्मत असावा? हिंदी सिनेमांमध्ये दाखवल्याप्रमाणे मूल जन्माला येतांना आईला त्रास होतो हे माहिती होतंच पण त्या त्रासाची मिती मला त्यादिवशी उमजली.त्यादिवशी मोठ्या तयारीनं मी हॉस्पिटलमध्ये गेले.    पहिल्यांदाच डिलीवरी बघणार त्यामुळे उत्सुकता, भीती आणि डॉक्टर व माणूस म्हणून असणाऱ्या सर्व भावनांची डोक्यात गिचमिड झालेली...