कटुसत्य

  • 7.3k
  • 2
  • 2.2k

हा माणुस १० वाजता आँफिसला जाण्यासाठी पायी निघाला होता. देवीचे दर्शन घेवुन निघताना त्याला अटँक आला आणि तो जाग्यावरच कोसळला. तो ही पालथा. कोसळताना त्याला कोणीही पाहील नाही .. हा मोठा गुढ प्रश्न आहे. देऊळात बरीच गर्दी असते. कुठल्याही भक्ताने त्याला पाहील नाही हे ही नवलच. चार पावलांवर फेमस वडापाव चा गाडा होता , त्या वडापाव वाल्याने किंवा खाणार्या लोकांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. खुप रहदारीचा रस्ता आहे तो , तरीही कोणीही पाहण्याची तसदी घेतली नाही. सर्वांची समजुत अशी होती की , ' तो दारु पिऊन पडला आहे '. विशेष म्हणजे एक ते दोन मिनीटाच्या अंतरावर पोलिस चौकी आहे, कोणीतरी पोलिसांना फोन केला होता तरीही पोलिस एकदाही फिरकले नाहीत असे तेथील जमाव बोलत होता .