श्यामचीं पत्रें - 7

  • 8.8k
  • 1
  • 2.1k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज खूपच थंडी आहे. बाहेरच्या गुलाबावरच्या कळया नीट फुलल्या नाहींत. सूर्याची ऊब मिळेल तेव्हां त्या फुलतील. प्रेमाची ऊब सर्वांना हवी. सूर्याचे प्रसन्न व प्रेमळ असे हात लागतांच या कळया खुदकन् हंसतील. वसंता, आज पहाटें एक मांजर थंडीत कुडकुडत होतें. तें माझ्या दाराजवळ येऊन केविलवाणें ओरडत होते. मी दार उघडलें व ते आंत आले. ते माझ्या पांघरुणांत शिरलें. मी त्याला जवळ घेतलें. तें घुरघुर करीत मला बिलगलें. प्रेमानें अनोळखी पशुपक्षीहि माणसाळतात. मग माणसें नाहीं का माणसाळणार?