शोकांतिका

  • 9.8k
  • 2.6k

शोकांतिका"मी काय करु ? कुठ जाऊ ?"सुरेखा ढसढसा रडत होती आणि मी हतबल झाले होते तिच्या भोगवट्याची गाथा ऐकून.  ही काय अठराव्या शतकातली गोष्ट नाही.आज आताच्या कल्पना चावला ,सुनिता विल्यम्सच्या युगातली...          सुरेखा तिसर्यावेळी प्रेग्नंट होती.आधीच्या दोन मुली.घरी गडगंज शेती,गाईगुरं,दूधदुभतं.इतक्या मोठ्या व्यापाला वारस नको का? अशा मानसिकतेतून तिसर्यांदा तरी मुलगा व्हावा म्हणुन तिच्या सासूनं देव पाण्यात ठेवले होते.गंडेदोरे बाबा बुवा सगळं झालं होतं.          पण सुरेखाचं दुर्दैव(?) ....आताही मुलगीच झाली....          शेतकरी ,अडाणी कुटुंब पण हाती शेतीवाडी भरपूर,आणि त्यामूळंच 'पैसा फेकला की कायबी व्हतंय'अशी वृत्ती-सर्वांचीच...   त्यात सुरेखाचा नवरा अकाली विधवा झालेल्या