क्रांती

  • 7.2k
  • 2
  • 2.2k

क्रांती खरतर मला या विषयावर लिहायचच नव्हतं. मी लिखाणाला सुरुवात केली तेव्हाच ठरवलेल काही विषय जाणुन बुजुन टाळायचे. कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळुन आज एवढी वर्ष झाली, पण आपले मुलभुत प्रश्न जागा सोडायला तयार नाहीत. शाळेतील निबंधाचे विषयही कित्येक वर्षापासुन तेच आहेत... स्ञीभ्रुणहत्या, हुंडाबळी आणि बरच काही... ते ही १०-१० मार्काला ! किती प्रगती केलीय आपण ! जग कुठे जात आहे आणि आपण..... असो सत्य ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नसतो. आपण मांडलेल्या सत्यावर परखड टिका ही होवु शकते. लिहीणार्याच्या अकलेचे कांदे वगैरे काढले जावु शकतात. आपल्याला नुसत मत मांडल्याने देशद्रोही वगैरे वगैरे लेबल ही लावले जावु शकतात सो... मुद्द्याकडे