८ वर्षांचा काळ लोटून गेला पण तिची व्यथा आज पण कोणी समजून घेतली नाही , ना तिच्या प्रियकराने आणि ना तिच्या घरच्यांनी कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर जॉब साठी खूप पर्यंत केल्यानंतर एका ठिकाणी तिची निवड झाली , अमृता नाव होते तिचे ,कामात खूप हुशार होती ती , तिच्यात फक्त एक कमी होती , ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर भाजलेले डाग होते , तसेच मोठ्यानं मान देणे , आदर करणे हे तिच्यावर झालेले संस्कार होते , कामात हळू हळू तिचा जम बसू लागला , सुरुवातीला नवीन असल्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागत होते , प्रत्येकाच्या काळाने वागत होती ती