श्यामचीं पत्रें - 12

  • 14.6k
  • 2k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागील पत्रांतून तुला यंत्रवाद, गांधीवाद, समाजवाद, साम्राज्यवाद, फॅसिझम वगैरेंविषयी थोडें थोडें लिहिलें होतें. गांधीवाद व समाजवाद यांतील साम्य व विरोध मी दाखवीत होतों. गांधीवादी लोकांची जीं तीन तत्वें तीं समाजवादानेंहि कशीं साधलीं जातात तें मी मांडले होतें.