पुष्कर गोलू आणि घुबड

  • 10.9k
  • 2
  • 2.7k

पुष्करचे बाबा वनाधिकारी होते. दरवर्षी सुट्टीत दिवाळीत आणि मे महिन्यात तो आईबरोबर जंगलात जात असे बाबांबरोबर रहायला. खूप आतुरतेने तो वाट पाहत असे त्या दिवसांची. बाबाबरोबर पहाटे झर्‍यावह जाणं,रात्रीच्या अंधारात घराच्या अंगणातून बाहेर पडून घुबडांचे आवाज ऐकणं! मे महिन्याच्या शेवटी पावसाळ्याच्या आधी काजव्यांनी चमचमणारी झाडं डोळे भरुन पाहणं असं खूप खूप काही... आई खूप सारा वेगवेगळा खाऊ सोबत नेत असे.जंगलात फारसं काही मिळत नसे आणि काही हवं असेल तर बाबा जीपने जवळच्या गावात जातील तेव्हा कुणा बरोबरतरी पिशव्या भरून पाठवत असत. अगदी फोनसुद्धा तिथे लागायचा नाही.त्यामुळे पुष्करला दोन्ही आजोबा आजींची आठवण आली तरी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप वाट पहावी लागे.मात्र