श्यामचीं पत्रें - 14

  • 9k
  • 1
  • 1.6k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागे तूं वर्धा योजनेविषयी विचारलेस. आज पुन्हा तूं असाच एक प्रश्न विचारला आहेस. आजकाल साहित्य व जीवन यांची चर्चा फार होत असते. हाच प्रश्न निराळया दृष्टिने मांडला तर कला व जीवन असा मांडावा लागेल. कारण साहित्य म्हणजे एक कलाच आहे. साहित्य या शब्दाचा अर्थच मुळी जें सदैव जीवनाच्यासह असतें ते. जीवनापासून वाङमयाची किंवा कोणत्याच कलेंची फारकत करतां येणार नाही.