रोमियो आणि जुलियट

(40)
  • 61.1k
  • 16
  • 16.9k

रोमियो आणि जुलियट कोणे एके काळी वेरोना नामक शहरी दोन अतिशय नामवंत घराणी राहत होती ‘माँटेग्यु’ आणि ‘कॅप्युलेट’. दोन्ही कुटुंब खूप सधन होती; आणि इतर सधन कुटुंबांप्रमाणे सुज्ञ आणि हुशारही होती. पण एका गोष्टीत ते अगदी टोकाचे दुराग्रही होते, ते म्हणजे त्या दोन्ही कुटुंबातील जुने वैर...! त्यातही इतर समजूतदार माणसांप्रमाणे हे प्रकरण मिटवायचे सोडून हे लोकं त्याचे भांडवल करीत असत, किंबहुना ते इतके चिघळवत ठेवत की ते कधीच संपता कामा नये. त्यामुळे माँटेग्यु किंवा कॅप्युलेट, दोन्ही घराण्यातील सदस्यांचा एकमेकांशी काहीच संवाद होत नसे, झालाच तर तो इतका असभ्य आणि उद्धट असे की ज्याचे रूपांतर वादविवादात होत असे. भरीस